बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुशांत गेला यात माझी काय चूक?”; भडकलेल्या अंकिताचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रचंड गाजलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. ती नेहमी तीचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते एवढचं नाही तर तीला नृत्याची आवड असून तीच्या इंस्टा पेजवर ती नेहमी नृत्याचे व्हीडिओ शेअर करत असते. मात्र या कारणांवरुन अलिकडे तीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अंकिता लोखंडेने बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत सोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केलं होतं. त्याचदरम्यान दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं, मात्र मागच्या वर्षी 14 जून 2020 ला सुशांतने आत्महत्या केली.

सुशांतचे फॅन्स अंकिताला अलिकडे सतत ट्रोल करत असल्यामुळे आता ती भडकल्याचं तीच्या इंस्टावर पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये समजतं. सोमवारी अंकिताने तीच्या इंस्टावर लाईव्ह येऊन लोकांशी संपर्क साधला. त्यादरम्यान ज्या लोकांना ती खटकते अशा लोकांनी तीला अनफाॅलो करावं, असं तीनं म्हटलं आहे. एवढचं नाही तर तीच्या या वागण्यामुळे लोक तीला शिवीगाळ करत आहेत. तीचे आई-वडिल या क्षेत्रातले नाहीत म्हणून या गोष्टी तीच्या आई-वडिलांना सहन होण्याच्या पलिकडे आहे, असं देखील तीनं सांगितलं आहे.

प्रत्येकाचं आयुष्यात एक ध्येय असतं,  सुशांतला पुढं जायचं होतं आणि सुशांतने तेच केलं. तो त्याच्या मार्गाने गेला असून यात माझी काय चूक? असा सवाल अंकिताने तीच्या आणि सुशांतच्या फॅन्सना केला आहे. गेल्या काही वर्षांपासून अंकिता कुणाच्या आयुष्यात नव्हती तरी सुशांतच्या प्रती असलेल्या तीच्या जबाबदाऱ्या तीने पार पाडल्या असल्याचं देखील तीने या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपुत यांचा 2016 मध्ये ब्रेकअपनंतर सुशांत रिया चक्रर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आला तर अंकिता बिझनेसमन विकी जैन सोबत नात्यात आली. मात्र अंकिताचा विकीसोबत साखरपुडा झाला असुन दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

थोडक्यात बातम्या-   

पोलिसांना विनाकारण वाहन अडवण्याचा नाही अधिकार, ‘या’ नंबरवर करा तक्रार!

महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी घटना, चक्क पोलिसांचाच सहभाग असल्यानं मोठी खळबळ

शिवसेना नेत्यानं शिवसेनेच्याच मंत्र्यावर गंभीर आरोप केल्यानं खळबळ

वाहन चालवण्याची हौस महागात; मुलाचा मृत्यू आणि आईवर गुन्हा दाखल

मुंबईत जाण्यास मला भीती वाटते; आता कंगणा रनौत केली ‘ही’ मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More