नवी दिल्ली | व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारला चांगलाच झटका दिला आहे. केंद्र सरकारने व्हायरल मॅसेजच्या मुळापर्यंत पोहोचण्याची प्रणाली विकसित करण्यास सांगितली होती. मात्र व्हॉट्सअॅपने याला स्पष्ट नकार दिला आहे.
देशात व्हॉट्सअॅपवरून व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजमुळे अनेक हत्या झाल्या आहेत. याला आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला धारेवर धरत मॅसेजच्या मुळापर्यंत पोहोचण्याची प्रणाली विकसित करण्यास सांगितलं होतं.
दरम्यान, या प्रणालीमुळे एंड-टू-एंड इनस्क्रीप्शन आणि युझर्सच्या प्रायव्हसीला धक्का लागू शकतो, त्यामुळे व्हॉट्सअॅपने या गोष्टीला नकार दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पुढच्या 100 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरप्लॅन!
-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन
-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप
-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!
-सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर