बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमरण उपोषण मागे घेणार नाही’; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं….

मुंबई | खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणास सुरूवात केली. राज्य सरकारने शब्द दिला होता मात्र, मागण्या मान्य न झाल्याने संभाजीराजेंनी उपोषणाचा पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

दिलीप वळसे पाटील आले त्याबद्दल मनापासून आभार मानतो. गृहमंत्र्यांनी सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. सरकारच्या बैठकीत काय झालं ते सांगितले. नाशिकमधील आंदोलन मागे घेतले, कारण सरकार सकारात्मक होते. गृहमंत्री 100 टक्के लक्ष घालतो म्हणाले. मात्र, आमरण उपोषण मागे घेणार नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.

मलाही त्रास व्हायला लागला आहे. बीपी लो झाला आहे. आम्ही कोणीही पक्षीय नाही आहोत. राजकीय अजेंडा नाही, कोणीची सुपारी घेवून आम्ही आलो नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. आता चर्चेचा गेट ओपन झाला आहे. समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथी संस्था, या काही मागण्यांसाठी संभाजीराजे आमरण उपोषण करत आहेत. माझा लढा गरिब मराठ्यांसाठी आहे, संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. संभाजीराजेंच्या उपोषणास राज्यभरातून पाठींबा दर्शविण्यात येत आहे. राज्यातील काही भागांमध्ये आंदोलन देखील करण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या-

“चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असतात हे कायम लक्षाच ठेवा”

…म्हणून ‘या’ टेनिसपटूला आपल्या एक्स गर्लफ्रेंडला दरमहा द्यावे लागणार दीड लाख रूपये

‘मला काम मिळत नव्हतं म्हणून मी…’, पूनम पांडेने कबूल केली ‘ती’ मोठी चूक

मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा, आता अमित ठाकरे…

डोळ्यांचा पांढरा भाग लाल होत असेल तर दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More