बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तरच पैसे मिळतील, जे काय करेल ते सरळ करेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद | 17 सप्टेंबर हा मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. आज ध्वजारोहनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये सकाळी पार पडला. या ध्वजारोहनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचं भूमिपूजन पार पडलं.

गेल्या 45 वर्षात जिल्हा परिषदेच्या इमारतीचा दुसऱ्यांदा उद्घाटनाचा असा प्रकार होणार नाही, अब्दुलजी या कामासाठी आणखी 20 कोटींचा निधी मिळेल, पण मला या निधीचा हिशोब हवा आहे. जे करायचं आहे, ते सरळ करेन. मला या ठिकाणी इमारत उभी झालेली पाहिजे म्हणजे पाहिजेच. यात कसलीही दयामाया चालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

इमारतीच्या कामाचा दर्जा मला चांगला हवा आहे. सर्व काम झाल्यावर कामाचा दर्जा उत्तम असला पाहिजे, अशी माझी अट आहे. याबरोबरच इमारत पूर्ण वेळेत झाली पाहिजे अशी माझी तिसरी अट आहे. या अटी मान्य असतील तर मी निधी कमी पडू देणार नाही. पण, मला तारखा द्याव्या लागतील. जर तारखेवर काम पूर्ण झालं तर पैसे मिळतील, अशा अटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री सत्तार यांना घातल्या आहेत.

दरम्यान, या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, मंत्री बाळासाहेब थोरात,मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री संदीपान भुमरे, खासदार इम्तियाज जलील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

थोडक्यात बातम्या –

रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल तर…- छगन भुजबळ

…अन् पुण्यातल्या पठ्ठ्यानं उभारलं चक्क गाडीचं स्मारक, पाहा व्हिडीओ!

“संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय”

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ!

रेल्वे रुळ सोडून आमच्या स्टेशनवर येऊ शकता- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More