अश्लील व्हिडिओंचा व्हॉट्सअॅप ग्रुप, अॅडमीनला अटक

नवी दिल्ली | लहान मुलांच्या अश्लील व्हिडिओचा ग्रुप चालवणाऱ्या व्हॉट्सअॅप अॅडमीनला सीबीआयनं अटक करण्यात आलीय. निखील वर्मा असं या 20 वर्षीय मुलाचं नाव आहे.

निखील उत्तर प्रदेशच्या कनौजमधून हा ग्रुप चालवत होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या या ग्रुपमध्ये अमेरिका, चीन, न्यूझिलंड, मेक्सिको, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्राझिल, केनिया आणि श्रीलंकेतील तब्बव 119 जण सहभागी होते. ही आंतरराष्ट्रीय टोळी लहान मुलाचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याचं काम करत होती. 

कीड्सएक्सएक्सएक्स असं या व्हॉट्सअॅप ग्रुपचं नाव होतं. सीबीआयने याप्रकरणी मुंबई, दिल्ली, नोएडा तसेच कनौजमध्ये तपास करण्यास सुरुवात केलीय.