Whats app Pin - आता व्हॉट्सअॅपवरही चॅट पिन करण्याची सुविधा
- विदेश

आता व्हॉट्सअॅपवरही चॅट पिन करण्याची सुविधा

नवी दिल्ली | व्हॉट्सअ‍ॅपने आता आपल्याला हवे ते अकाऊंट अथवा ग्रुपला पिन करुन अग्रस्थानी ठेवण्याची सुविधा प्रदान केली आहे. फेसबुक ग्रुपमध्ये तसेच पेजेसमध्ये पिन करण्याची सुविधा यापूर्वीच देण्यात आली आहे.

वैयक्तीक अकाऊंट किंवा कोणत्याही ग्रुपवर काही काळ बोट दाबून धरल्यानंतर आधीच्या पर्यायांसोबतच पीनचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करुन संबंधीत अकाऊंट चॅट क्रमवारीच्या अग्रस्थानी ठेवता येईल. ही सुविधा सध्या फक्त बिटा आवृत्तीसाठी दिली आहे, लवकरच ती इतर वापरकर्त्यांनाही मिळेल.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा