व्हॉट्सअॅपचा तब्बल एक तास उशिरानं नव्या वर्षात प्रवेश

मुंबई | जग नव्या वर्षात प्रवेश करत असताना व्हॉट्सअॅप मात्र पुन्हा एकदा गंडलेलं पहायला मिळालं. तब्बल एक तास उशिराने व्हॉट्सअॅपने नव्या वर्षात प्रवेश केला.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअॅपचा वापर केला. त्यामुळे साधारण साडेअकरा वाजल्यापासून व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवायला अडचण येत होती. 12 वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप ठप्प झालं होतं.

फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेक देशांमध्ये व्हॉट्सअॅप ठप्प झालं होतं. ट्विटरवर #WhatsAppDown हा हॅशटॅग ट्रेंड झाला. अखेर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप पूर्ववत झालं. मात्र 1 तास उशिराने व्हॉट्सअॅपने नवीन वर्षात प्रवेश केल्याने आता सोशल मीडियावर विनोदाचा पाऊस सुरु झालाय.