व्हॉट्सअॅप ग्रुपसाठी आलं नवं फीचर, पाहा काय आहे खास!

मुंबई | मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप अप टू डेट राहण्यासाठी सतत काही ना काही बदल करत असतं. व्हॉट्सअॅपने आता आपल्या ग्रुप मेंबरसाठी नवी फीचर लाँच केलं आहे. 

ग्रुप डिस्क्रीप्शन असं या फीचरचं नाव आहे. फेसबुक ग्रुपमध्ये ज्याप्रमाणे त्या ग्रुपचं डिस्क्रीप्शन देता येतं. तसाच या फीचरचा उपयोग आहे. 

फेसबुकवर फक्त अॅडमीनलाच हे डिस्क्रीप्शन बदलण्याचा अधिकार असतो. व्हॉट्सअॅपमध्ये मात्र तसं नाहीये. इथे अॅडमीनसोबत काही अन्य जणांनाही हे डिस्क्रीप्शन बदलण्याचा अधिकार असेल. सध्या काही यूझर्सना दिसणारं हे फीचर लवकरच सर्वांना दिसेल.