मुंबई | व्हॉट्सअपने आपल्या नियम आणि अटींमध्ये मोठे बदल केले आहेत, हे बदल ज्यांना मान्य नसतील त्यांचं व्हॉट्सअप अकाऊंट बंद होणार आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून लोकांनी व्हॉट्सअपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून नवीन मेसेजिंग अॅपचा सहारा घेतला आहे.
नव्या अटींनूसार व्हॉट्सअप आपल्या यूझर्सचा जास्तीत जास्त डाटा फेसबुकसोबत शेअर करणार आहे. जे अत्यंत धोकादायक मानलं जात आहे. त्यामुळे अनेकांनी आता व्हॉट्सअप ऐवजी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.
व्हॉट्सअपच्या पर्यायांमध्ये सिग्नल या अॅपला सर्वात जास्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हे एक ओपन सोर्स अॅप्लिकेशन असून ज्यामध्ये सर्वात जास्त काळजी यूझरच्या प्रायवसीची घेण्यात आली आहे.
जगातील अनेक ख्यातनाम व्यक्ती, कलावंत, पत्रकार तसेच राजकीय मंडळी देखील या अॅपचा वापर करत आहे. टेस्ला कार कंपनीचे सीईओ एलान मस्क यांनी देखील आपल्या फॉलोवर्सना व्हॉट्सअपऐवजी सिग्नल अॅप वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे व्हॉट्सअप ऐवजी या अॅपची क्रेझ वाढताना दिसत आहे.
थोडक्यात बातम्या-
बहुचर्चित टाटा अल्ट्रोजमध्ये मोठा बदल; ‘या’ तारखेला उठणार पडदा!
10 चिमुकल्यांच्या मृत्यूबद्दल राहुल गांधींकडून दु:ख व्यक्त; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
10 चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत मुख्यंत्र्यांकडून दुःख व्यक्त; दिले चौकशीचे आदेश
भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणार- अजित पवार
…नाहीतर 8 फेब्रुवारीपासून तुमचं व्हॉट्सअप अकाऊंट आपोआप बंद होणार!