बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“डोकंच नसेल तर शरीराचा काय फायदा? सेनापतीच नाही तर लढायचं कसं?”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात खळबळ उडालेली दिसत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील रंगलेला वाद आहे आता चांगलाच रंगलेला दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या हायकमांडवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच आता याच मुद्द्यावरून शिवसेनेने काँग्रेसला उपदेशाचे टाॅनिक दिले आहे.

काँग्रेस पक्षाने उसळी मारून पुन्हा उठावं आणि मैदानात उतरावं, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अध्यक्ष हवाच, असं शिवसेनेने अग्रलेखातून म्हटलं आहे. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

काँग्रेसशिवाय भाजपला जिंकता येत नाही. तर भाजपलाही काँग्रेसचे टाॅनित लागते. पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी समजणार?, असा सवाल शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून विचारला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे स्वत:चा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्ड्यात घालतील, असा इशारा देखील शिवसेनेने दिला आहे.

दरम्यान, पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचं तरी कसं? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. काँग्रेस पक्षात नेता कोण, हा प्रश्न आहेच. गांधी परिवार आहे. पण नेता कोण?, असा सवाल देखील शिवसेनेने विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

रेल्वे स्टेशनवर सापडला होता नारायण, MPSCतून बनला अधिकारी; बच्चू कडूंचंही योगदान!

पुण्यातील उद्यानाच्या नावावरुन नवा वाद, ‘साध्वी’ शब्द हटवण्याची मागणीमुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

‘जर परमबीर सिंह भारताबाहेर गेले असतील तर’..; गृहमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More