बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुलींनी कंडोम विकत घेण्यात गैर काय?’;’या’ अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री प्रनूतन बहल सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो नेहमी शेअर करत असते. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा आगामी चित्रपट कंडोमवर असल्यानं तिनं एका मुलाखती दरम्यान त्याच्यावर भाष्य केलेलं पहायला मिळालं. कंडोमविषयी केलेल्या भाष्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेत्री प्रनूतन बहलचा आगामी चित्रपट ‘हेल्मेट’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाद्वारे कंडोमविषयी असणाऱ्या समाज मान्यतांवर भाष्य केलं जाणार आहे. चित्रपटाच्या मुलाखतीवेळी मुलीनं कंडोम घेण्यात गैर काय आहे, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रनूतननं म्हटलं की, आपल्याकडे कंडोमविषयी बोललं जात नाही. या चित्रपटाद्वारे आम्ही हाच संदेश देणार आहोत की तुम्ही कंडोम विकत घेऊन काही चूक करत नाही. उलट कंडोममुळे अनेक आजार, लोकसंख्या, नको असलेलं गर्भधारणा हे सगळंच टाळलं जातं.

दरम्यान, समाजामुळे तुम्ही या गोष्टी मागायला लाजता. मात्र लाजण्याची काही एक गरज नाही. उलट यामुळे अनेक गोष्टींपासून सुटका होते. फक्त मुलंच नाही तर मुलीही कंडोम मागू शकतात. यात काही गैर नाही. आमचा चित्रपटही याच संकल्पनेवर आधारित असल्याचं प्रनूतन बहनं म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pranutan Bahl (@pranutan)

थोडक्यात बातम्या – 

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘8 पदरी रस्ता, 6 पदरी पुल अन् वर मेट्रो’; नितीन गडकरींचं पुण्यासाठी मोठं स्वप्न!

‘युपी निवडणुकीआधी बड्या हिंदू नेत्याची….’; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त वक्तव्य

“थोडं थांबा… दिवाळीनंतर आपलंच सरकार येणार”

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; ‘हे’ प्रमाणपत्र नसेल तरीही मिळणार प्रवेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More