बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘इसमे गलत क्या है?’; पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला ‘या’ काँग्रेस नेत्याचा पाठिंबा

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बेधडक वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस आणि सेना, राष्ट्रवादीत यांच्या खटके पडत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यानंतर नाना पटोले एकाकी पडल्याचं चित्र होतं. त्यानंतर आता एका काँग्रेस नेत्यानं सरप्राईज ट्विट करत नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा दर्शवला आहे.

सर्व राजकीय पक्षांना आपला पक्ष वाढवायचा आहे. काँग्रेसही स्वबळावर स्थानिक निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. जेणेकरून पाया मजबूत व्हावा. यात चुकीचं काय आहे? काँग्रेसच्या या रणनीतीवर दोन्ही मित्रपक्षांना आक्षेप का आहे? कॉंग्रेस नेहमी त्यांच्या मागे राहावा का?, असा सवाल संजय निरूपम यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर त्यांनी ‘स्वबळ’ असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

काही दिवसांपुर्वी नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनीही स्वबळाची भाषा केली होती. त्यानंतर काँग्रेसचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील नाना पटोलेंना पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, नाना पटोलेंच्या नाऱ्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात फुट पडलेली दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी गेल्या काही काळापासून अधिक जवळ येताना दिसतीये. त्यामुळे नाना पटोले नाराज असल्याचं सागितलं जात होतं.

थोडक्यात बातम्या-

नेहा कक्कर गरोदर?; एअरपोर्टवरील लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

“किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा”

आंगावर काटा आणणारा व्हिडीओ, हात निसटला अन् ती थेट 9व्या मजल्यावरुन खाली कोसळली

“काँग्रेस स्वबळाची भाषा करत असेल, तर दुसऱ्यांनी पोटात दुखवून घेण्याचं काय कारण”

करीना कपूरचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात, बीडमध्ये तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More