बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाहेर पडायला तुमची फाटते, त्यात आमचा काय दोष?’; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | आगामी काळात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेश उत्सवावर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे राज्यभरात दहीहंडी साजरी करण्यास परवानगी देण्यात आली नाही. आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नियम डावलत दहीहंडी साजरी केल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.

राज्य सरकारने सणसमारंभाच्या काळात लावलेल्या निर्बंधावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष? असा टोला राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कुठेही जाणवत नाही. विनाकारण इमारती सील करायच्या आणि निर्बंध लावायचे? सरकारने आता सणउत्सव साजरे करण्यासाठी आणि मंदीरं उघडण्यासाठी परवानगी द्यावी, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

काल ठाण्यात ज्या परप्रांतिय फेरीवाल्याने महिला अधिकाऱ्यांवर हल्ला केला. ज्या दिवशी तो जेलमधून सुटेल त्या दिवशी आमच्याकडून त्याची मस्ती उतरवत त्याची सर्व बोटे छाटली जातील. पुन्हा त्याला फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही. तेव्हा त्यांना कळेल. या फेरीवाल्यांची  हिंमत कशी होते?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही बोटं छाटता, आज पकडले आहेत. उद्या बाहेर येतील पुन्हा बोटं छाटायला. मग हे सरकार काय करत आहे? यांना भीती काय असते ते जेलमधून बाहेर आल्यावर समजेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान, गतवर्षीच्या आणि यावर्षीच्या कोरोनाच्या परिस्थितीत खूप फरक आहे. गेल्या वर्षी पण दहीहंडी साजरी केली नव्हती. पी. साईनाथ यांच्या दुष्काळ आवडे सर्वांना या पुस्तकासारखा लाॅकडाऊन आवडे सरकारला असा टोला राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला आहे. भाजपची जनआशीर्वाद यात्रा निघाली, नारायण राणेंची यात्रा पार पडली. त्यांचे मेळावे सुरू आहेत. दोघांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिर बंद असताना अभिषेक केला, म्हणत त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधलं.

थोडक्यात बातम्या –

श्रीलंकेच्या ‘या’ गाण्याने घातली भारतीयांना भुरळ; सोशल मीडियावर रिल्सचा धुमाकूळ

चौकशीला दांडी मारत नारायण राणे दिल्लीला रवाना; वकिलांनी दिलं ‘हे’ कारण

जळगाव जिल्ह्यात पुराचं सावट; नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला

‘…म्हणून सांगतो चड्डीत राहायचं’; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

राज्यभरात पावसाची संततधार! ‘या’ भागात ढगफूटीसह दरड कोसळली; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More