बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोबाईल इंटरनेट शिवाय Whatsapp वापरता येणार; वाचा कसं

नवी दिल्ली | जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हाॅट्सअॅप नवनवीन फिचर्स वापरकर्त्यांसाठी आणत असतं. त्यामुळेच गेल्या 7 वर्षापासून व्हाॅट्स अॅप अव्वल स्थानी आहे. मागील काही दिवसांपासून व्हाॅट्सअॅपच्या नव्या फिचर्सची सर्वांनाच आतुरता होती. व्हाॅट्स अॅपचे एक नवीन फिचर आता येत आहे. त्यात तुम्हाला मोबाईल इंटरनेटशिवाय देखील व्हाॅट्सअॅपचा वापर करता येणार आहे.

व्हाॅट्स अॅप फीचरमुळे सध्या वेब व्हर्जन व्हाॅट्सअॅपला मोबाइल सोबत संगणकावर सुद्धा चालवण्याची सुविधा आहे. परंतु यासाठी संगणकावर आणि मोबाईलवर इंटरनेट असणं गरजेचं असतं. पण आता व्हाॅट्स अॅपचं नवीन फीचर येत आहे. ते आल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉपवर किंवा लॅपटाॅपवर व्हाॅट्स अॅपचा वापर करण्यासाठी फोनची गरज पडणार नाही.

आगामी काही काळात डेस्कटॉपवर व्हाॅट्सअॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला मोबाइलवरून क्युआर कोड स्कॅन करण्याची गरज पडणार नाही. कंपनी व्हाॅट्स अॅप वेबसाठी अॅक्टिव मोबाइल कनेक्शनचं बंधन काढून टाकणार आहे, अशी माहिती हॅकरेडने दिली आहे. फोनमध्ये इंटरनेट बंद असले तरी व्हाॅट्स अॅप वेब व्हर्जनचा तुम्हाला वापर करण्यात येऊ शकणार आहे.

दरम्यान, व्हाॅट्सअॅपचा आणखी एक प्रयोग करण्यात येत आहे. यात एकच अकाऊंट चार ठिकाणी वापरता येणार आहे. त्यातही मेन डिव्हाईसला इंटरनेटची गरज पडणार नाही.

थोडक्यात बातम्या-

ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

दीड वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांच्या मांडीवर सोडला प्राण, नंतर वडिलांनी केलं अभिमानास्पद कृत्य…

‘या’ जिल्ह्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश; आता फक्त ‘या’ कारणासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर

‘संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा’; काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांंना पत्र

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More