Top News तंत्रज्ञान देश

नविन पॉलिसीवर व्हॉट्सअॅपने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण; नवीन पॉलिसी केवळ….

नवी दिल्ली | इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हाट्सअपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे जगभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळं व्हॉट्सअप कंपनीनं आपल्या नवीन पॉलिसीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

नविन प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल झाल्यानं तुम्ही तुमच्या मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नसल्याचं  व्हाट्सअॅपकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात कंपनीनं ट्विट करत माहिती दिली आहे.

तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी असल्याचा दावाही कंपनीनं केला आहे.

दरम्यान, फेसबुक कंपनी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची चॅटिंग वाचू शकणार नाही किंवा युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्टही फेसबुकसोबत शेअर केली जाणार नसल्याचंही व्हॉट्सअॅप कंपनीनं सांगितलं आहे.


थोडक्यात बातम्या-

व्हॉट्सअपला धक्क्यावर धक्के; पहिलं स्थानही गमावलं, हे अॅप बनलं नंबर वन!

व्हॉट्सअपला मोठा झटका; ‘या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय

“मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत”

मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?; किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

तीन दिवसात दोनदा घसरले सोन्याचे भाव; आज काय आहे किंमत???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या