Top News तंत्रज्ञान देश

व्हाॅट्सअपला धक्के सुरुच; ‘या’ बड्या कंपन्यांचा बायबाय; सिग्नलला दिली पसंती!

नवी दिल्ली |  व्हॉट्सअॅपच्या नविन प्रायव्हसी पॉलिसीला विरोध केला जात आहे. लोकांची जबरदस्ती वैयक्तिक माहिती घेण्याच्या नव्या निर्णयामुळं व्हॉट्सअ‍ॅपवर नाराजी वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सामान्य वापरकर्तेच नाही तर मोठ मोठ्या कंपन्यांच्या सीईओ आणि बिझिनेस टायकोन्स यांनीही या मेसेजिंग प्लॅटफॉर्मशिवाय इतर अ‍ॅप्सची निवड करण्यास सुरुवात केली आहे.

पेमेंट गेटवे अ‍ॅप फोन पे सीईओसह कंपनीच्या 1000 हून अधिक कर्मचार्‍यांनी त्यांच्या मोबाईलमधून व्हॉट्सअॅप काढून टाकलं आहे. आता हे कर्मचारी त्यांच्या सर्व कामांसाठी सिग्नल अॅप वापरत आहेत. ही माहिती फोन पे कंपनीचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी ट्विटरव्दारे दिली.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही व्हॉट्सअ‍ॅप सोडले आहे. आता ते सिग्नलवर आले असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटद्वारे दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनीही आता व्हॉट्सअॅपऐवजी सिग्नल वापरत आहेत. या व्यतिरिक्त कंपनीच्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपही सोडलं असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एलोन मस्क यांनी अलीकडेच लोकांना आवाहन केले की, व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी धोरणामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी त्यांच्या चॅटिंगसाठी सिग्नलचा वापर करावा. या आवाहनानंतर जगभरातील लोकांनी व्हॉट्सअॅप इनस्टॉल करण्यास सुरवात केली. तसंच, एका रिपोर्टनुसार पेमेंट अ‍ॅप पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही आपल्या टीमच्या संवादासाठी व्हॉट्सअॅपपासून दूर राहाण्यास सांगितले आहे.

थोडक्यात बातम्या-

क्रिकेटची हत्या केली म्हणणाऱ्या भाजप खासदाराला हनुमा विहारीचा रिप्लाय, सेहवागला हसू आवरेना

एनसीबीने जावयाच्या घरी धाड टाकल्यानंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

संकटं येतच राहतात मात्र सत्याचा पराभव कधीच होत नाही- रेणू शर्मा

महिलेसोबत नको त्या गोष्टीवर चर्चा; तीन यूट्यूबर्सना पोलिसांकडून अटक

Freedom 251 मोबाईल आठवतो का?, त्याच्या मालकाला नव्या घोटाळ्यात अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या