Top News महाराष्ट्र मुंबई

व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ओळख, मग महिलेकडून पैसे घेतले, नंतर पैसे देण्याच्या बहाण्याने…

Photo- Facebook/WhatsApp

मुंबई | सीबीडी पोलीस ठाण्यात एका व्हाट्सअप ग्रुपच्या ऍडमिनने सदस्य असलेल्या महिलेवर बलात्कार करून, तिला धमकी देत असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. एवढेच नव्हे तर या ऍडमिनने सदर महिलेची आर्थिक फसवणूक देखील केली असल्याचा आरोप केला आहे.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन नावाचा व्हाट्सअप ग्रुप असलेल्या ऍडमिनचे नाव बापू पाटील असून तो सोलापूरचा राहणारा आहे. या ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांपैकी एका महिलेसोबत बापू पाटीलने जवळीक वाढवली. याचदरम्यान महिलेला अर्जंट काम असल्याचे सांगून तातडीने ७५ हजार उसने देण्याची विनंती केली होती. महिलेने उसने पैसे दिल्यावर काही महिन्यानंतर परतफेड करताना पाटील टाळटाळ करु लागला.

शेवटी दोन महिन्यांपूर्वी बापूने बेलापूरमधील सीबीडी मधील एका हाॅटेलमध्ये काॅन्फरस असल्याचे कारण सांगून महिलेला एका खोलीमध्ये पैसे घेण्यास बोलावले. तिथं तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार महिलेने केली आहे. याचसोबत महिलेचे व्हाट्सअप हॅक करुन इतरांसोबतचे खासगी चॅट्स आणि फोटोज व्हायरल करण्याची धमकी सुद्धा बापू पाटीने महिलेला दिली होती.

दरम्यान, मागील महिन्यात या घटनेची तक्रार सबीडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून बापू पाटीलला अटक करण्यात आली आहे, अशी माहीती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू!

“ठाकरे सरकारच्या नेत्यांचा वेळ कामधंदे सोडून ‘या’ गोष्टींमध्ये जातोय”

खडसेंनी दिलेला ‘तो’ इशारा खरा करुन दाखवला, भाजपला जबर धक्का!

सैराटमध्ये लंगड्याची भूमिका साकारणाऱ्या तानाजीलाही लागली लॉटरी!

Happy Birthday माँ… केक अब फीका लगता है!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या