बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Whasapp New Feature: व्हाॅट्सअॅपचं ‘हे’ नवं फीचर लवकरच होणार लाॅंच

नवी दिल्ली | सोशल मीडियाची क्रेेझ दिवसेंदिवस वाढत चाललेली पहायला मिळत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात व्हाॅट्सअॅप वापरणाऱ्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर कल पहायला मिळत आहे. अशातच व्हाॅट्सअॅपचं एक नवं फीचर लाॅंच होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी नवीन फीचर वापरात आणणार असून, ग्रुप अॅडमिनसाठी आक्षेपार्ह संदेश हटवणे सोपे होणार आहे. तसेच, ग्रुपच्या अॅडमिनला ग्रुपवरील संदेश सर्वासाठीच डिलीट करता येणार आहेत. यामुळे ग्रुपच्या विचारसरणीशी सुसंगत नसलेले संदेश ग्रुपमधील सदस्यांनी बघायच्या पहिलेच हटवण्याचा अधिकार अॅडमिनला मिळणार आहे.

तुम्ही जर ग्रुप अॅडमिन असाल, तर व्हॉट्सअॅप बीटाच्या येणाऱ्या नवीन फीचरमध्ये तुम्हाला ग्रुपमधील मेसेज सर्वासाठी डिलीट करता येणे शक्य होणार आहे, जर एखादा अॅडमिन मेसेज डिलीट करतो तेव्हा (This was deleted by an admin) अशी नोट दिसेल. अॅडमिनने मेसेज डिलीट केला आहे हे देखील ग्रुपच्या सदस्यांना समजू शकेल.

दरम्यान, वापरकर्त्यांकडे एकदा पाठवलेला संदेश फक्त एक तास, आठ मिनिटे आणि सोळा सेकंदापर्यत डिलीट करण्याचा पर्याय आहे. मात्र येणाऱ्या अपडेटमध्ये वापरकर्त्यांना संदेश पाठवल्यानंतर सात ते आठ दिवसांपर्यंत डिलीट करण्याचा पर्याय मिळणार असल्याचं समजंत आहे.  wabetainfoने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, अॅड्रॉइड वापरकर्त्यांनाही हे नवे फीटर वापरता येणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना मोठा झटका

“‘टिपू सुलतान’ नामकरणावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे”

‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही’; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार डाॅ. अनिल अवचट यांचं निधन

“लोकांना येडं बनवण्याचं काम चालूये”, चंद्रकांत पाटलांची अजित पवारांवर खोचक टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More