Top News तंत्रज्ञान देश

व्हॉट्सअपला धक्क्यावर धक्के; पहिलं स्थानही गमावलं, हे अॅप बनलं नंबर वन!

नवी दिल्ली | इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला नविन पॉलिसी 2021चा चांगलोच जोरदार फटका बसला आहे. जगभरात या पॉलिसीचा विरोध केला जात आहे. त्यामुळे अनेकजण अन्य मेसेजिंगकडे वळत आहेत.

व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीचा फायदा सिग्नलला झाला असून, अॅपल अॅप स्टोरवर सिग्नलने व्हॉट्सअॅपला मागे टाकून टॉप पोझिशन मिळवली आहे. सिग्नलने हे स्थान केवळ ४८ तासांत कमावलं आहे. भारतात हजारो लोकांनी व्हॉट्सअॅप नविन पॉलिसी 2021 च्या अटी, शर्थींना तसेच नियमला डेटा सिक्योरिटी विरोधात असल्याचं सांगून मेसेजिंग अॅपला अनइन्स्टॉल करणं सुरु केलं आहे.

सिग्नलचा दावा आहे की, त्यांचे प्लॅटफॉर्म अॅड फ्री असून प्रायव्हसी जपण्यात अव्वल आहे. डाउनलोड मध्ये Signal Free Apps कॅटेगरीत Apple App Store वर नंबर वनच्या स्थानावर पोहोचले आहे. तर Google Play Store वर चौथ्या स्थानावर पोहोचलं आहे.

तसंच, प्ले स्टोरवर सिग्नलला डाउनलोड करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. लवकरच या ठिकाणी सुद्धा ते टॉप स्थानावर पोहोचेल असं मानलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत”

मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?; किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

तीन दिवसात दोनदा घसरले सोन्याचे भाव; आज काय आहे किंमत???

‘शेतकरी आंदोलन फसवे, आता हे नाटक बंद झाले पाहिजे’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सरकारनं सुरक्षा काढली; मनसेनं स्थापन केलं स्वतःचं सुरक्षा पथक!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या