WhatsApp च्या नवीन फीचरमुळं जुनी चॅटिंग शोधणं झालं आणखी सोपं

मुंबई | WhatsApp हे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅपपैकी एक आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत अनेकजण WhatsApp वर चॅट करण्यात गुंतलेले असतात. आता या वापरकर्त्यांसाठी एक खुशखबर आहे.

अलीकडं WhatsApp वर सातत्यानं नवीन फीचर्स येत आहे. त्यातच नुकत्याच आलेल्या फीचरमुळं आता चॅटिंग करणं मजेशीर झालं आहे. त्यामुळं तुम्हाला कोणाचीही चॅट शोधणं सोपं झालं आहे.

नुकत्याच आलेल्या नवीन फीचरमुळं वापकर्त्यांना तारखेनुसार चॅट शोधता येणार आहे. त्यामुळं यूजर्सला एखाद्या दिवशीची चॅट हवी असेल, तर त्यासाठी त्यांना पूर्ण चॅट चाळत बसण्याची गरज नाही. परंतु या फीचर्सचा लाभ केवळ ios बीटा वापरकर्त्यांना घेता येईल.

या नवीन फीचरमुळं आता एकदम जुनी चॅट शोधणंही सोपं झालं आहे, सर्चमध्ये जाऊन फक्त तारीख टाकली की, त्या दिवशीची चॅट समोर येईल.

वापरकर्त्यांना सर्च विभागात नवीन कॅलेंडर आयकाॅन दिसेन. यावर टॅप केल्यानंतर तारखेनुसार मेसेज दिसतील. त्यामुळं अगदी काही सेकंदात कितीही जुनी चॅट पाहणं सोपं झालं आहे.

दरम्यान, ‘मेसेज युवरसेल्फ’ हे फीचरही मल्टी डिव्हाईस सपोर्ट म्हणून सादर करण्यात आलं आहे. त्यामुळं महत्वाची माहितीचे संकलन करण्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरेल. सध्या हे फीचर सर्वांना वापरता येणार नाही, परंतु लवकरच या फीचरचा लाभ सर्व WhatsApp वापरकर्त्यांना मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या-