बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Wheather Update : पुढील 5 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस

पुणे | राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनानं हैराण करुन सोडलं आहे. तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यातही अवकाळी पाऊस (Rain) कोसळत आहे. त्यामुळे सध्या नागरिक तर वैतागल्याचं पहायला मिळत आहे.

सध्या उन्हाळा सुरु झाला असून अनेक ठिकाणी उन्हाची झळ बसायला सुरुवात झाली आहे. अशातच हवामान विभागानंही पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरीही हैराण झाले आहेत.

पुढील 5 दिवसांत केरळ, माहेमध्ये हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसांत किनारपट्टी कर्नाटक, लक्षद्वीप, तामिळनाडूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 12-14 मार्च दरम्यान कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे.

थोडक्यात बातम्या – 

“ठाकरे सरकारच्या या अहंकारामुळे महाराष्ट्राची….”; आशिष शेलारांचा हल्लाबोल

7 सेकंदाच्या व्हिडीओमुळे ‘ही’ मुलगी झाली व्हायरल, पाहा व्हिडीओ

सुशांत सिंह राजपूतच्या दोन्ही एक्स अचानक समोरासमोर अन्…, पाहा ‘तो’ व्हिडीओ

पंजाबच्या विजयानंतर आईला मिठी मारत भगवंत मान भावूक, पाहा ‘तो’ व्हिडीओ

बंदीनंतर संधी शोधणाऱ्या श्रीसंतची निवृत्तीची घोषणा, पाहा ‘तो’ भावनिक व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More