पाकिस्तानला आणखी एक धक्का; व्हीलचेअर क्रिकेट सामन्यातही भारताचा विजय

दुबई | भारतीय क्रिकेट संघाकडून पाकिस्तानचा झालेला पराभव ताजा असतानाच पाकिस्तानसाठी आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाने सुद्धा पाकिस्तानचा पराभव केला आहे. 

युएईमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या व्हीलचेअर क्रिकेट संघांमध्ये फ्रेंडशिप कप 2018 चा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 181 धावा केल्या. 

पाकिस्तानी संघाला भारतीय संघानं दिलेलं आव्हान पेलवलं नाही. त्यांचा संपूर्ण संघ 16 षटकात अवघ्या 92 धावात बाद झाला. या सामन्यात भारतीय संघाची 89 धावांनी सरशी झाली. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पाकिस्तानच्या खेळाडूंनी लाज आणली; रडणाऱ्या पाकिस्तान्याचा व्हीडिओ व्हायरल

-कुत्र्याची चक्क महापौरपदी निवड; मांजर, लांडगा, गाढवाचा केला पराभव!

-गणपती बाप्पा प्रसन्न होतो, पाहिजे त्याला अपत्यही देतो- विश्वास नांगरे-पाटील

-रोहित शर्माच्या टीम इंडियाकडून पाकिस्तानचा अक्षरशः धुव्वा

-शून्यावर बाद झाला धोनी; संतापलेल्या छोट्या फॅनने डोक्यावर घेतलं मैदान!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या