बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् प्रवाशांनी खचाखच भरलेली रेल्वे जेव्हा उलटी धावायला लागते, पाहा व्हिडिओ

डेहरादुन | दिल्ली ते उत्तराखंड धावणारी पूर्णगिरी जनशताब्दी एक्सप्रेस काही तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 35 किलोमीटर उलट दिशेने धावण्याची घटना घडली आहे. इंजिनवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे.

पूर्णगिरी जनशताब्दी एक्सप्रेस ही दिल्ली ते उत्तराखंड धावते. उत्तराखंडच्या तानकपूर जिल्ह्याला जाणारी ही गाडी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने तानकपूरला न जाता उलट दिशेने 35 किलोमीटर धावली. या रेल्वेचा उलट धावतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रेल्वेसमोर प्राणी दिसल्याने रेल्वेच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. पण याचवेळेला त्याचा इंजिनवरचा ताबा सुटल्याने संपूर्ण रेल्वे उलट दिशेने धावायला लागली. सुदैवाने या घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अखेर 35 किलोमीटर उलट दिशेने प्रवास केल्यानंतर ही रेल्वे खातीमा या ठिकाणी थांबवण्यात प्रशासनाला यश आलं. सुदैवाने या घटनेदरम्यान पाठीमागून दुसरी रेल्वे येत नसल्याने मोठा अनर्थ टळला.

उलट धावल्यानंतर खातीमा येथे पोहोचलेल्या रेल्वेतील प्रवाशांना त्यानंतर बसमध्ये बसवुन तानकपूरला रवाना करण्यात आलं. दरम्यान या घटनेच्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलचं डोक्यावर घेतलं असून हा मजेशीर आणि अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वीही मुंबईमध्ये अशी घटना घडली होती. त्यावेळी ब्रेक न लागल्याने रेल्वे उलट दिशेने धावू लागली होती. पण काही वेळानंतर चढ आल्याने ती रेल्वे आपोआप थांबली होती. त्या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या –

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?- उर्मिला मातोंडकर

ऐकावं ते नवलचं! ट्रकमध्ये हेल्मेट नाही घातलं म्हणुन चालकाला तब्बल एवढा दंड!

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती”

नुसता झगमगाट!!! ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More