बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांची पुढील लढाई केव्हा आणि कुठे होईल? राकेश टिकैत म्हणाले…

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारने यावर काही तोडगा काढलेला नाही. पंतप्रधान मोदींनी या कायद्यांनी शेतकऱ्याला फायदा होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. अशातच आज 32 शेतकरी संघटनांनी चंदीगडमधील राजभवनाकडे कूच केली आहे. यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रशासनासह मोदी सरकारला गंभीर ईशारा दिला आहे.

यावेळी राकेश टिकैत म्हणाले की, आंदोलनातील आमच्या ज्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे, त्यांना एकतर तिहारच्या जेलमध्ये पाठवा किंवा त्यांची राष्ट्रपतींशी भेट घालून द्या. आम्ही त्यानंतर सांगू की, दिल्लीवर काय ईलाज करायचा आहे ते. दिल्ली ट्रॅक्टरशिवाय ऐकत नाही. आता लढाई कोठे होईल, ठिकाण आणि वेळ काय असेल? हे ठरवून सांगू त्यावेळी मोठी क्रांती दिसून येईल.

तसेच हे सरकार नेहमी खोटं बोलतं. हे सरकार बोलतं एक आणि करतं एक. 26 जून रोजी डेहरादुन आणि दिल्लीसह विविध ठिकाणी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र, दिल्लीत खासदारांना भेटवतो असं सांगून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडण्यात आलं. ही लोकशाहीची हत्या आहे, असंही राकेश टिकैत यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही. तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. नव्या कृषी विधेयकांमुळे देशातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. यामुळे मोदी सरकार या कृषी कायद्यांबद्दल काय तोडगा काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

जेवणात मटण नाही म्हणून नवरदेव पसार अन्…

राष्ट्रपतींचा दौरा दोघांच्या जिवावर बेतला! 3 वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेने प्राण गमावले

ह्रदयद्रावक! दीड फुटांची सळई छातीतून आरपार गेलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

मोदी सरकार विरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार? राऊतांनी दिली आतली बातमी

कोरोनाकाळात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेत बँकिंग सेक्टरला मात्र अच्छे दिन; नफ्यात दुपटीने वाढ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More