बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार”

सोलापूर | शिवसेनेतर्फे निवडणूक लढवलेले नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी विरोधी पक्ष भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. सोलापूरमध्ये बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जेव्हा आपल्याला सांगतील तेव्हा मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी पाटील यांनी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली तर देवेंद्र फडणवीसांंचं कौतुक केलं.

मी राष्ट्रवादीमध्ये असतानासुद्धा देवेंद्र फडणवीसांनी माझी महामंडळावर नियुक्ती केली होती. तर त्यावेळी मी फडणवीसांच्या सांगण्यावरून शिवसेनेतर्फे खासदारकीची निवडणुक लढवली असल्याचं पाटील म्हणाले.  आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवं होतं. मात्र त्यांनी महामंडळ बर्खास्त केलं असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारमधील नेते माझ्याविरोधात मुख्यमंत्र्याचे कान भरण्यात यशस्वी ठरले असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. आता मी भाजपसाठी काम करणार असून देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं पाटील म्हणाले. यावेळी बोलताना पाटलांनी भाजपचे खासदार उदयनराजे भासले यांच्यासोबत झालेल्या भेटीवेळी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिलं.

दरम्यान, प्रवासात असताना योगायोगाने उदयनराजे भोसले यांची भेट झाली. राज्यातील अस्थिर वातावरण पाहता स्थिर व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा असं मी मनमोकळेपणाने बोललो. पण पहाटेचा शपथविधी होणार की दुपारचा शपथविधी होणार हे मी सांगू शकत नाही. कोणतेही तर्कवितर्क लावायला मी काही ज्योतिष नसल्याचं नरेंद्र पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

सरकारच्या अडचणीत आणखी वाढ; पुण्यातील कारागृह अधीक्षकाची ‘या’ कारणाने इच्छामरणाची मागणी

संगीत क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी सावनीची वाचा कहानी

‘फडणवीस सरकारच्या काळात आरएसएसचा वाटा किती?’; नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

धक्कादायक! पतीच्या ह्रदयविकाराने झालेल्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडला प्राण; 8 दिवस मृतदेह कुजत होता फ्लॅटमध्ये

अभिनेता आमीर खानलाही कोरोनाची लागण, दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसोबत झाला कार्यक्रम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More