बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस शाळेत जात होते तेव्हा…”, नवाब मलिकांचा खोचक टोला

मुंबई | रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (NCP chief Sharad Pawar’s birthday) राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुभेच्छा देत शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. “शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांचा पक्ष स्थापन झाल्यापासून त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाहिलं जातं. परंतु,त्यांचे आजवर 10च्या वर खासदार निवडूण आले नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik)
यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  शरद पवार राजकारण संपलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावेळेस चमत्कार घडला होता आणि आताही ते टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो. त्यामुळं 2024 चमत्कार मध्येही घडवून आणू  असं सांगतानाचं फडणवीस जेव्हा शाळेत जात होते तेव्हा भाजप (BJP) खासदाराची संख्या दोन होती, असं म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

तुमचे खासदार डबल सीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरला आहात का?, असा प्रश्न नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. ही लोकशाही आहे. अमृत पिऊन कोणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस यांना कळलं पाहिजे. तसेच पवार किंवा राष्ट्रावादीने शरद पवार पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही. उलट पवारसाहेब सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी काम करत आहेत, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रावादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या होत्या. खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी गुजरातमधील 26 खासदार असणारा नेता पंतप्रधान  होऊ शकतो तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील महाराजांचा मावळा हा सर्वोच्च विराजमान का होणार नाही? असं अमोल कोल्हे म्हणाले होते. तर शरद पवारांच्या पंतप्रधानपदावरून  देवेंद्र फडणवीसांनी स्वप्न बघायला काही हरकत नाही, असं म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“…तर पुन्हा Lockdown लावलं जाऊ शकतं”, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

“1 लाख जण अंगावर आले तर काय कराल?”, राज ठाकरेंचा सवाल

लग्नात जोरदार एन्ट्री करणं पडलं महागात; घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

“चौकीदारला आपलं ट्विटर अकाऊंट वाचवता येत नाही, देश काय वाचवणार?”

ST Strike | “लोकांवर अरेरावी करण्यासाठी हे राज्य तुमच्या हातात दिलं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More