बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’; मानसी नाईक भडकली

मुंबई | मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध लावणी डान्सर मानसी नाईक हिने काही महिन्यांपुर्वी बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्न गाठ बांधली. तिच्या लग्नानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं. एक मराठी मुलगी आणि कलाकार असून तुला लग्नासाठी कोणी मराठी मुलगा मिळाला नाही का? अशा अनेक सवालांनी मानसीला ट्रोल करण्यात आलं होत. आता पुन्हा एकदा मानसीला एक यूझरने ट्रोल करत शिवीगाळ केली आहे. यावर मानसीने संताप व्यक्त केला आहे.

नुकतच मानसीने एक लाईव्ह सेशनमध्ये भाग घेतला होता. यामध्ये तिच्या पोस्टवर घाणेरडी कमेंट करणाऱ्या यूझरला तिने तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं होतं? आणि तुम्ही तिथं काय करत होता?, असा सवाल केला. एवढच नाही तर संतापलेल्या मानसी नाईकने त्याला बरंच काही सुनावलं. यादरम्यान बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रिया चालवतात त्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी ते काम करतात, त्या त्यांच्या हिमतीवर जगतात, प्रामाणिकपणे काम करतात, असं देखील तिने म्हटलं आहे.

बुधवार पेठेतील स्त्रिया तिथे का आल्या असं तुम्हाला वाटत? असा सवाल मानसीने पुन्हा त्यावेळी केला. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करून खा मात्र दुसऱ्यांना अशा भाषेत शिव्या घालून काय मिळतं? आणि कलाकारांच्या काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून त्यांच्यावर शिवीगाळ करणं हे चुकीचं आहे, असं मानसीने म्हटलंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता शशांक केतकर यालाही ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र त्या युझरला वास्तवाचं भान करून देत शशांकने त्याला चांगलंच सुनावलं होतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

थोडक्यात बातम्या-

प्रियांका चोप्राची बहिण आली भांडणावर, प्रियांकावर केले अत्यंत धक्कादायक आरोप

तलफ तलफ तलफ… गुटखा, तंबाखूची पुडी, देशी दारु महागली!

पुण्यात महिलेचा मृतदेह आढळला, अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्यानं खळबळ

आज 4 वाजल्यानंतर हे काम कराच, अन्यथा मिळणार नाही कोरोनावरील लस!

विराट कोहलीला मोठा दिलासा, रोहित शर्मानं उधारीवर दिला आपला ‘हा’ खेळाडू!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More