बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत पोलिसांनी केलं धक्कादायक कृत्य!

जयपूर | राजस्थान येथील अलवार भागात एका पोलिसांनी महिलेवर सलग तीन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला 26 वर्षाची असून ती पोलीस ठाण्यात तीच्या पतीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती. त्यानंतर एका 56 वर्षाच्या पोलिस उपनिरीक्षकाने तीला आपल्या जाळ्यात अडकवून तिच्या बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह यांनी मला पतीसोबत साम्यंजस्याने तोडगा काढू असं सांगत मला जाळ्यात ओढलं आणि 3 दिवस माझ्यावर बलात्कार केला. 54 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक भरत सिंहने 26 वर्षीय तक्रारदार महिलेला पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या त्याच्या कार्यालयात आणि घरी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला, असं महिलेने सांगितलं आहे.

महिलेला 7 मार्च रोजी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं तेव्हा तिने विरोध केला. दुपारनंतर जेव्हा ती महिला पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा तिने पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करत तक्रार दिली. प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

दरम्यान, पोलीस महासंचालक हवासिंह घुमरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत भरत सिंह दोषी अढळ्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच याआधीसुद्धा अलवार पोलिस ठाण्यातील पोलिस काॅन्स्टेबल रामजीत गुर्जर यांच्यावर सुद्धा एका महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवली होती.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातही अंश:त लाॅकडाऊन; जाणून घ्या

“महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ”

देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे – भाई जगताप

‘भाजपची मक्तेदारी आहे का?, अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नाही’; अजित पवार आक्रम

‘हे महाराष्ट्राच बजेट की मुंबई महापालिकेचं’; अर्थसंकल्पावरून देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More