बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी 6 बाॅलवर 6 सिक्स मारले तेव्हा धोनी…’; तब्बल 13 वर्षानंतर युवराज सिंगचा खुलासा

मुंबई | भारतीय संघाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि भारतीय संघाचा माजी स्टार खेळाडू युवराज सिंग यांच्यात एक अनोख नातं आहे. एकमेकांवर जीव लावणारे दोन मित्र कधी कधी एकमेकांचं गुणगाण करतात तर कधी एकमेकांवर टीका देखील करताना दिसतात. मैदानावर त्यांची जोडी जय आणि विरूची जोडी असायची. अनेक कार्यक्रमात धोनीची खिल्ली उडवणाऱ्या युवराजने एक मोठा खुलासा केला आहे.

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुड बाॅड याला युवराज सिंगने 6 चेंडूत 6 षटकार खेचत नवा इतिहास रचला होता. त्या सामन्यात युवराजने तुफान फटकेबाजी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक फास्ट अर्धशतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. आजही तो रेकाॅर्ड त्याच्याच नावावर आहे. त्या सामन्यात 6 षटकार मारले तेव्हा नाॅनस्ट्राईकवर असणाऱ्या धोनीची काय प्रतिक्रिया होती, यावर युवराजने भाष्य केलं आहे.

मी जेव्हा 6 षटकार मारले होते तेव्हा धोनीला खूप आनंद झाला होता. मला वाटतं, जेव्हा तुम्ही संघाचे कर्णधार असता आणि संघातला एक खेळाडू लागोपाठ सिक्स मारत असतो, आनंद होतोच कारण स्कोअरबोर्ड धावत असतो आणि सामनाही जिंकणं गरजेचं असतं. सामना तर टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमधला होता, असं युवराज म्हणाला.

टी ट्वेन्टी वर्ल्ड कप दरम्यान सर्व वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर होते. सर्व तरुण खेळाडूंना संधी दिली होती. त्यामुळे मला कर्णधार केलं जाईल अशी मला अपेक्षा होती. माझ्यासाठी ती मोठी संधीही होती. पण अचानक एमएस धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली. धोनी माझ्या कर्णधारपदाच्या आड आला, अशीही नाराजी युवराजने बोलून दाखवली आहे.

थोडक्यात बातम्या-

“चीनच्या कपटनीतीवर लक्ष ठेवावंच लागेल, गाफील राहून चालणार नाही”

पुण्याचा श्वास आणखी थोडा मोकळा होणार; वाचा 14 जूनपासून काय सुरु, काय बंद?

सहकारमहर्षी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे यांचं निधन

“काँग्रेसमध्ये आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल”

कौतुकास्पद! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा जगताप दाम्पत्याचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More