Top News खेळ

टीम इंडियात स्थान मिळालं नाही हे कळलं तेव्हा…; अखेर सुर्यकुमार यादवने सोडलं मौन

मुंबई | भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. 27 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादवला संधी देण्यात आली नव्हती.

सुर्यकुमारला संधी न देण्यात आल्याने सोशल मिडीयावर चाहत्यांनी बीसीसीआयला जाब देखील विचारले. अखेर या मुद्द्यावर आता सुर्यकुमारने मौन सोडलं आहे.

सुर्यकुमार यादव म्हणाला, “खरं सांगायचं तर मला अपेक्षित होतं की ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी माझी निवड होईल. मात्र ज्यावेळी मला संधी न मिळाल्याचं समजलं तेव्हा फार उदास वाटलं. मला पुन्हा एकदा संधी मिळाली नाही ही भावनाच माझ्या मनातून जात नव्हती.”

“आता मी संधीची वाट पाहतोय. माझी प्रतिभा दाखवण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ आहे. त्या वेळेचा मी सदुपयोग करेन. शिवाय सचिन तेंडुलकर यांनीहीतू तुझा खेळ खेळत राहा आणि धावा जमवत राहा असं सांगितलंय. आणि आता मी त्याच गोष्टीनुसार वागतोय,” असंही सुर्यकुमार म्हणालाय.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, कारण…- चंद्रकांत पाटील

राज्यपाल समजूतदार आहेत, आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर लवकरच निर्णय घेतील- छगन भुजबळ

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

‘ही’ गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

आयसीसीचा मोठा निर्णय! ‘या’ वर्षाखालील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या