“मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, लोकांच्या आग्रहास्तव…”
कोल्हापूर काँग्रेस पक्षाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक होत आहे. सदर निवडणूक ही भाजप विरूद्ध काँग्रेस अशी रंगणार आहे. मात्र, या निवडणुकीमध्ये बिगबॉस फेम अभिजित बिचुकले उतरण्याची शक्यता आहे. अभिजित बिचुकलेनं आतापर्यंत राज्यात अनेक निवडणुकांसाठी अर्ज भरलेले आहेत. अभिजित बिचुलकेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित सल्ला देखील दिला होता.
मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग तर येतो, अशी कोल्हापूरमध्ये चर्चा आहे. लोकांच्या आग्रहास्तव काहीतरी भूमिका मांडू. वरळी आणि कडेगावमध्ये मी गेल्यामुळेचं निवडणुका लागल्या होत्या. कोल्हापूरचे लोक माझ्यावर प्रेम करतात. त्यामुळे काही जणांना भेटून निर्णय घेऊ. मी काही निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र, येत्या दोन दिवसांमध्ये भूमिका स्पष्ट करणार आहे, असं अभिजित बिचुकलेनं म्हटलं आहे.
कोल्हापूरमध्ये मंदिर सोडलं तर कशाचाही विकास झाला नाही. पुणे आणि मुंबईच्या तुलनेने कोल्हापूरचा विकास झाला नाही. नेत्यांची स्वत:ची खळगी भरली आहे. लोकांना वाऱ्यावर सोडलं आहे. मी अधिकृत घोषणा केली नसली तरी चर्चा होत आहे, असं अभिजित बिचुकलेनं म्हटलं आहे. बेरोजगारी आणि महिला सबलीकरण याविषयांवर लढा उभारू, असं अभिजित बिचुकले सांगितलं.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हात एकही आमदार नाही, अशी भाजपची खंत आहे. कोल्हापूरमधील ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली तर तिकिट देऊ, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. काँग्रेसही उत्तर कोल्हापूर हा मतदारसंघ हातातून जाऊ नये, यासाठी प्रयत्न तयारी करत आहे. त्यातच अनेक निवडणुकांचा अनुभव असलेले अभिजित बिचुकले निवडणुकीत उतरण्याची चर्चा आहे.
थोडक्यात बातम्या-
‘या’ भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाचा गंभीर इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार कारवाई?, BMC चा पुन्हा दणका
“शिवसेनेसारख्या पक्षानी महाराष्ट्रामध्ये जातीभेदाचं बीज पेरलंय”
Deltacronचा पुन्हा धुमाकूळ, ‘या’ ठिकाणी आढळून आले नवे रूग्ण
“देश सध्या चारच लोक चालवत आहेत, दोघं विकतात तर 2 जण खरेदी करतात”
Comments are closed.