बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते”

नाशिक | नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. छगन भुजबळ यांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. तसेच महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर ते मंत्री झाले असते का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सन्माननीय संजय राऊत हे महाविकास आघाडीचे  शिल्पकार आहेत. त्यामुळे शिल्पाला तडा जाऊ नये याची जबाबदारी शिल्पकाराची अधिक आहे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

शिवसेनेत मुख्यमंत्री झालो असतो हे मला मान्य आहे परंतु, कोणालाही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही. मी जेव्हा शिवसेना मोठी केली तेव्हा ते खासदार देखील नव्हते, असा जोरदार टोला छगन भुजबळ यांनी संजय राऊतांना लगावला आहे. तसेच संजय राऊत यांना सामनाचं संपादकपद हे काम केल्यानेचं मिळालं आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, नांदगाव मतदार संघ विसरा असे ते म्हणाले याबाबत मला शरद पवार साहेबांशी बोलावं लागेल. नांदगावमध्ये मी जे काम केलं आहे ते त्यांना माहित नसावं कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करावं लागतं. त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करतो त्यांनी मतदारसंघात परत यावं, असं आव्हान छगन भुजबळ संजय राऊतांना दिलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

दिलासादायक! राज्यात आज हजारांहून कमी रूग्णांची नोंद

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

“समीर वानखेडेंविरुद्ध षडयंत्र, महाविकास आघाडीच्या दबावातून प्रभाकर साईलने…”

“किरण गोसावीचा मनसुख हिरेन झालाय का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More