बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला तर त्या मागचा हेतू कधीच शुद्ध राहत नाही”

औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे यांनी गनिमीकावा करत थेट दिल्लीवरून खासगी विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा अहमदनगरमध्ये आणला होता. त्यानंतर त्यांनी तो साठा आणल्याचं एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केलं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणात याचिका दाखल करण्यात आली.

औरंगाबाद खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना सुजय विखे यांनी आणलेला इंजेक्शनचा संपूर्ण साठा प्रशासनाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. परंतु प्रशासनाने ताब्यात घेण्याआधीच संपूर्ण साठा हा सुजय विखे यांनी वाटून टाकला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रशासनाला एकही इंजेक्शन ताब्यात घेता आलं नाही. या प्रकरणात सुजय विखेंवर कारवाई होईल, हे त्यांना माहीत असताना देखील त्यांनी धाडस करून दिल्लीवरून इंजेक्शनचा मोठा साठा अहमदनगरमध्ये आणला.

होणाऱ्या कारवाईला न घाबरता लोकांचा जीव वाचवणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं असल्याने मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचं सुजय विखे यांनी बोलून दाखवलं होतं. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे यांच्या कृत्यावर ताशेरे ओढत ‘चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल, तर त्या कृती मागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही’. अशा शब्दात सुजय विखे यांना सुनावलं आहे.

या सर्व प्रकरणात न्यायमूर्ती घुगे यांनी सुजय विखे यांच्या वकीलाला सुनावणी दरम्यान म्हटले आहे की, ‘तुमच्या अशिलाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. इंजेक्शन उतरवतानाचे व्हिडीओ चित्रीकरण करून नाटकीपणा करायला नको होता आणि मी स्वतःचं वजन वापरून दिल्लीतून कशी इंजेक्शन आणली हे सांगण्याचा दिखाऊपणा ही त्यांनी टाळायला हवा होता’, असं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात सुजय विखे यांनी 10000 इंजेक्शन आणले असा बोलबाला सुरू होता. परंतु 15 बॉक्समध्ये फक्त 1200 इंजेक्शन होती, असं स्पष्टीकरण सुनावणीदरम्यान देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने कमी व्हायला सुरूवात; बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक

फक्त 12 रुपयांत 2 लाखांचा विमा; मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत सहभागी झालात का?

…अन् चक्क स्मशानभूमी बाहेर हाऊसफुल्लचा फलक; कोरोनामुळे विदारक परिस्थिती

दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू, वृद्ध आई-बापाचा टाहो ऐकून सारं गाव सुन्न

“…अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More