बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2022 मध्ये मोदी राष्ट्रपती बनतील, तेव्हा राष्ट्रपती राजवट लावून ते स्वत: सरकार चालवतील”

नवी दिल्ली | कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता 6 महिने पूर्ण होतील. दिल्लीच्या सीमाभागावर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे किसान युनियनचे नेता राकेश टीकेत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती बनतील, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शेतकरी नेते राकेश टीकेत यांनी सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे आणि राष्ट्रपती राजवट लागू व्हायला पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2022 मध्ये राष्ट्रपती बनुन, संपूर्ण भारतात राष्ट्रपती राजवट लागू करून देश चालवतील, अशा प्रकारची टीका त्यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुका 2024 ला होणार असल्या तरी राष्ट्रपतींची निवडणुक 2022 मध्ये होणार आहे. त्यामुळे मोदीच पुढचे राष्ट्रपती होतील आणि राष्ट्रपती राजवट लागू करून सरकार चालवतील, अशाप्रकारची खोचक टीका राकेश टिकैत यांनी चर्चेदरम्यान केली आहे. त्याबरोबरच लसीकरणावरूनही त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना होत आहे, लोक आजारी पडत आहेत आणि लस घेतल्यामुळेच अनेक लोकांचा जीव गेला असल्याचाही आरोप राकेश टीकेत यांनी केंद्र सरकारवर केला आहे. राकेश टीकेत यांनी केलेल्या या टीकेवर सरकार नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

अरबी समुद्रातील वादळाचं रौद्ररुप, पुण्यावर काय परिणाम होणार?

काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव काळाच्या पडद्याआड; कोरोनाशी झुंज अपयशी

अदर यांच्यानंतर आता वडील सायरस पुनावालाही लंडनला रवाना, नव्या चर्चांना उधाण

नियम न पाळणाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई, ॲम्बुलन्समध्ये बसवून कोरोना…पाहा व्हिडीओ

पुण्यात मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा थरार, 10 जणांच्या टोळक्याकडून सपासप वार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More