मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांनी लव्ह जिहादवर कायदा करावा, आम्ही त्यानंतर पाहू, असं म्हटलं आहे.
भाजप लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करत आहे. उत्तर प्रदेशमध्ये करत आहेत, इतर राज्यांमध्ये करत आहेत. तर, माझी सूचना अशी आहे की इतर राज्यात कोण काय कायदा करतं ते पाहायचं आहे. खासकरुन बिहारमध्ये नितीश कुमार कुठल्या प्रकारचा कायदा करतात ते पाहायचं आहे. त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करु, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना दिलंय.
काही लोक लव्ह जिहादबाबत कायदा करण्यास सांगत आहेत. या विषयावर माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्याला पुढील तीन वर्षातच पहिल्या क्रमांकावर नेऊ, असा विश्वास आणि आत्मविश्वास आम्हाला आहे, असं राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल- देवेंद्र फडणवीस
“चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम, सत्ता गेल्याने त्यांची अवस्था मनोरुग्णासारखी झालीये”
“बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं पण…”
सांगितलं होतं पवारांचा नाद करू नका, पण..- धनंजय मुंडे शहीद जवान संग्राम पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरात दाखल