‘ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झाले’, उद्धव ठाकरे म्हणतात…
मुंबई | शिवसेनेत ना भूतो ना भविष्यती अशा बंडानंतर शिवसेनेला (Shivsena) तिच्या स्थापनेपासूनचा सर्वात मोठा झटका मिळाला आहे. त्यानंतर शिवसेनेने आता पुन्हा शून्यातून उभारी घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे आणि स्वत: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कंबर कसून कामाला लागले आहेत. या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकासाठी (Daily Samna) शिवसेनेचे खासदार आणि पत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांची एक विशेष मुलाखत घेतली.
सदर मुलाखतीत अनेक प्रश्नोत्तरे झाली. त्यात उद्धव ठाकरे यांनी अनेक खुलासे केले आणि त्यांच्या पक्षातील बंडखोर आमदारांवर तिखट शब्दात आगपाखड देखील केली. या संवादादरम्यान संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबद्दल विचारले. ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते ते उपमुख्यमंत्री झाले आहेत, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न राऊतांनी विचारला होता.
आजची महाराष्ट्रातील परिस्थिती आपल्याला हास्यजत्रा दुसरा सिझन वाटत नाही का? ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते ते उपमुख्यमंत्री झाले असे राऊतांनी म्हटल्यावर त्यावर उद्धव ठाकरे यांनी स्मितहास्य करत, उपरवाले की मेहरबानी असे म्हटले. यावरुन राऊतांनी हा कोणता उपरवाला? असा प्रश्न केला. त्यावर ठाकरे म्हणाले ज्यांचे त्यांना ठाऊक.
त्यांची ही मुलाखत काल (दि. 26) सामनाच्या अंकात प्रकाशित झाली. तसेच याचे प्रक्षेपण सर्व प्रसारमाध्यमांवर प्रदर्शित झाल्यानंतर ही मुलाखत खूप जास्त प्रमाणात पाहिली जात आहे. त्यावर महाराष्ट्रातील इतर पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाच्या संघर्षाचा येत्या एक ऑगस्टला समारोप होईल, अशी सर्वांना उत्सुक्ता आहे. त्यामुळे सर्व ऑगस्टच्या प्रतिक्षेत आहेत.
थोडक्यात बातम्या –
“उद्धव ठाकरे दोनवेळा घरातून पळून गेले, त्यांना नारायण राणेंनी परत आणलं”
‘घरगुती कार्यक्रम एकदम ओक्के’, महामुलाखतीवरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी
“…संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी”
‘आपलेच प्रश्न आपलीच उत्तरं, मुलाखत नाही हा घरचा मामला’; मनसेची तुफान टोलेबाजी
Comments are closed.