बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’

मुंबई | राष्ट्रवादीने अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे नुकसानग्रस्त भागासाठी मदत जाहीर केली आहे. यात एकूण 16 हजार कुटुंबांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे मदत करण्यात येणार आहे. 250 डॉक्टरांची तुकडी पुरग्रस्त भागातील नागरिकांची तपासणी करेल, त्याचबरोबर त्यांना योग्य ती औषधे पुरवण्यात येणार असल्याचं देखील शरद पवारांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषदेच्या दरम्यान शरद पवार यांनी किल्लारी भुकंपाच्या वेळचा एक किस्सा सांगितला.

पत्रकार परिषदेच्यावेळी शरद पवारांनी पुरग्रस्त भागाचे दौरे टाळण्याचं आवाहन केलं. नुकसानग्रस्त भागात शासकिय यंत्रणा काम करण्यात व्यस्त असतात. नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी दौरे केल्यानं शासकिय यंत्रणांचं लक्ष विचलित होतं. त्यामुळे नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे टाळावेत, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्यावेळी त्यांनी लातूरमध्ये झालेल्या किल्लारी भूकंपावेळचा घडलेला किस्सा त्यांनी सांगितला.

मी लातूरला असताना आम्ही सर्वजण कामात होतो. त्यावेळी पंतप्रधान लातूरमध्ये येत होते. मी पंतप्रधानांना सांगितलं की, किमान 10 दिवस तरी येऊ नका. तुम्ही आलात तर सर्व यंत्रणा तिकडे लावावी लागेल. त्यांनी लगेच माझी विनंती मान्य केली. ते 10 दिवसानंतर आले. मी सुद्धा दौऱ्यावर जात नाही. त्यामुळे सगळी यंत्रणा फिरवावी लागते, असं शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान, 30 सप्टेंबर 1993 साली किल्लारी गावात मोठा भुकंप आला होता. त्या भुकंपाने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला हादरवून टाकलं होतं. या भूकंपात एकूण 3,663 जणांचा मृत्यु झाला होता. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या कार्यकाळात किल्लारीचं पुनर्वसन केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

आर्थिक संकटांमुळे मोदी सरकार अतिरिक्त नोटा छापणार?; निर्मला सितारामन म्हणतात…

राज कुंद्रा प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आलं समोर

राज्यात पुन्हा पावसाचं संकट; महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळियेत दाखल; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

महापुरामुळे चिंताग्रस्त असलेल्या शरद पवार यांची तातडीची पत्रकार परिषद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More