बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याच्या आयुक्त असताना ‘त्या’ खंडणी गोळा करत असायच्या; रश्मी शुक्लांवर ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप

मुंबई | बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला पुण्याच्या आयुक्त असताना त्या खंडणी गोळा करत असायच्या आणि हा सर्व प्रकार धुमाळ या पोलीस निरीक्षकाच्या मार्फत व्हायचा असा खुलासाही राठोड यांनी केला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणामध्ये आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. फोन टॅपिंग प्रकरण उजेडात आल्यापासून रश्मी शुक्ला हे नाव सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पुण्याच्या आयुक्तपदी रश्मी शुक्ला या कार्यरत असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, तसेच हा सर्व प्रकार माहीत असूनही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यावर पडदा टाकला असल्याचंही हरिभाऊ राठोड यांनी बोलून दाखवलं.

हरिभाऊ राठोड हे बंजारा समाजाचं नेतृत्व करतात. त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आणि देवेंद्र फडणवीसांवर असे गंभीर आरोप केल्यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तसेच या सर्व गोष्टींमुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. हरिभाऊ राठोड यांनी मुंबई येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना हा गंभीर आरोप केला.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल ट्विट करून रश्मी शुक्ला यांनी शिरोळ मतदारसंघाचे आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्यावर भाजपमध्ये राहण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता. त्यावर यड्रावकर यांनीही समोर येऊन प्रतिक्रिया देत या वृत्ताला दुजोरा दिला.

थोडक्यात बातम्या – 

10वी आणि 12 वीच्या परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील- नितीन गडकरी

ऐकावे ते नवलच! ना भारतात, ना परदेशात, बापाने केली बाळासाठी चक्क चंद्रावर जमिनीची खरेदी

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ‘इतके’ वर्ष लागणार- बिल गेट्स

ड्रीम्स मॉलमधील कोविड सेंटरच्या आगीला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार- देवेंद्र फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More