बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् त्या महिलेवर कॅमेरा फोकस होताच प्रेक्षकांनी सुरू केला टाळ्यांचा कडकडाट

लंडन | विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जगातील प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते. याच विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचा एक सामना नोवाक जोकोव्हीच आणि जॅक ड्रॅपर यांच्यात सुरू होता. त्यावेळी अचानक लाऊडस्पीकरवर आवाज सुरू झाला. एँकरने लाऊडस्पीकरवर एक घोषणा करण्यात आली. त्यानंतर मैदानावर फोकस असलेला कॅमेरा एका महिलेकडे दाखवला आणि त्यानंतर त्या महिलेसाठी सर्वांनी जागेवरून उठून टाळ्यांचा कडकडाट केला.

विम्बल्डनच्या आयोजकांनी खास बाब म्हणून काही सुरुवातीच्या सामन्यांसाठी ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा आणि कोरोना लस विकसित करणाऱ्यांना खास व्हीआयपी बॉक्समध्ये बसून सामना पाहण्याचे आमंत्रण दिण्यात आले होते. त्याच आमंत्रणात  ब्रिटीश व्हायरोलॉजिस्ट सारा गिल्बर्ट यादेखील सामना पाहण्यास आल्या होत्या. सारा गिल्बर्ट यांनी ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनका कोरोना लस विकसित केली होती. त्यांना आदर देण्यासाठी प्रेक्षकांनी उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

एँकरने लाऊडस्पीकरवर रॉयल बॉक्समध्ये कोरोना लस विकसित करणारे संशोधक आणि एनएचएसचे अधिकारीदेखील असल्याचं सांगितले. त्यानंतर कॅमेरा सारा गिल्बर्ट यांच्यावर फोकस करण्यात आला. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. जवळपास एक मिनिटांपेक्षाही अधिक वेळ प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या.

दरम्यान, प्रेक्षकांनी दिलेल्या सन्मानाबद्दल संशोधक आणि एनएचएसचे अधिकारी भावूक झालेले दिसले. या सामन्यात नोवाक जोकोव्हीचने जॅक ड्रॅपरचा पराभव केला. जोकोव्हीचने  4 -6, 6-1, 6-2, 6-2  या फरकाने जॅक ड्रॅपरचा पराभव केला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 99 दिवसातील निच्चांकी, रूग्णसंख्येत 11 हजारांची घट

पुणे महापालिकेच्या प्रश्नांसाठी अजित पवारांची मंत्रालयात बैठक, पण महापौरांना मात्र निमंत्रणच नाही!

चक्क हवाई बेटांसारखी तीन दिवस रंगणार होती इगतपुरी रेव्ह पार्टी

“ईडीला सर्व पुरावे मिळाले, अनिल देशमुखांना लवकरच अटक होईल”

‘सुप्रिया ताईंचा ईडीवर पक्का विश्वास आहे’; भाजपची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More