जेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात!

बीड | लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथगडावर काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने दोन दिवसीय आरोग्य शिबीर झाले. त्या शिबीरात प्रितम मुंडे यांनी आपली खासदारकी विसरुन त्या स्वत: जनतेला साहाय्य करत असतांना दिसत होत्या.

खासदार असण्यापूर्वी आपण डॉक्टर असल्याचे सांगणाऱ्या डॉ. प्रितम मुंडेंनी या दोन दिवसांत आपला स्टेथोस्कोप खालीच ठेवला नाही.  

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या एकत्र सहकार्याने झालेल्या शिबीरासाठी साधारण 200 तज्ज्ञ डॉक्टर आणि मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही उपस्थित होते.

दरम्यान, खुद्द एमबीबीएस असल्याने इतर रुग्णांचीही त्यांनी या दोन दिवसांत तपासणी करुन उपचार केले.

महत्वाच्या बातम्या –

-हॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल

-मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’

-IND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी

-अटल बिहारी वाजपेयींच चित्र असलेलं नाणं चलनात येणार

-मी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर