बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विवाहीत प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दोघांना विजेच्या खांबाला बांधलं अन्…

पाटणा | लग्नानंतर काही काळ संसार चांगला चालू असतो. काही काळानंतर आपल्या जोडीदाराला वैतागून नवरा नाही तर बायको दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याच्या अनेक घटना पाहायला मिळतात. यातून अनेक गुन्हे घडतात तर अनेकांचं दुसरं लग्न होतं. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. मात्र ही घटना विचित्र आहे.

संबंधित घटना ही बिहारमधील वीरपूर पोलीस ठाणे हद्दीतील तुरकैजनी गावातील आहे. येथे रहिवासी असणाऱ्या जोडप्यातील संबंधित महिलेचा पती काही कारणामुळे घरा बाहेर गेला होता. यादरम्यान महिलेला भेटायला एक तरुण तिच्या घरी आला. संबंधित महिला आणि तरुणाला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. त्यानंतर गावकऱ्यांनी मिळून दोघांना गावातील विजेच्या खांबाला बांधून ठेवलं.

सकाळ होताच गावकऱ्यांनी महिलेचं आणि तरुणाचं लग्न लावून दिलं. संंबंधित महिलेला 2 वर्षांची मुलगी आहे. तसेच तरुणासोबत न राहता आपल्या पतीसोबत राहण्याची इच्छा महिलेने व्यक्त केली आहे. याचबरोबर लग्न लावून दिलेल्या तरुणासोबत आपले कोणत्याच प्रकारचे अनैतीक संबंध नसल्याचे महिलेने सांगितलं आहे.

दरम्यान, पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता दोन्ही कुटुंबामध्ये बातचीत चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. संबंधित घटना ही रविवारी घडली आहे. रविवारी दोघांना रात्रभर बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी सकाळी दोघांचा जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला आहे. संबंधित तरुण हा महिलेच्या माहेरील घराच्या शेजारी राहत असल्याचं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पंढरपूरमध्ये पुन्हा पोटनिवडणूक घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र

“चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला तर त्या मागचा हेतू कधीच शुद्ध राहत नाही”

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने कमी व्हायला सुरूवात; बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक

फक्त 12 रुपयांत 2 लाखांचा विमा; मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत सहभागी झालात का?

…अन् चक्क स्मशानभूमी बाहेर हाऊसफुल्लचा फलक; कोरोनामुळे विदारक परिस्थिती

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More