खेळ

माही तुझ्या नसण्यानं… पराभवानंतर चाहत्यांना आली आठवण

हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या आजच्या सामन्यात भारताचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना धोनीची उणिव जाणवली. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पहायला मिळाला. 

आजच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडचे ट्रेंट बोल्ट आणि काॅलिन डी ग्रँडहोम या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज टिकू शकले नाहीत.

धोनी आणि विराटच्या अनुपस्थिती यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. 50 धावसंख्या होण्याच्या आतच भारताचा निम्मा संघ गारद झाला होता.

दरम्यान, धोनीच्या चाहत्यांनी त्याच्या मागच्या सामन्यातील आकडेवारींचं ट्वीट करत, अशा प्रसंगात धोनी संघात हवा होता, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवारांचं भाषण सुरु असताना जिल्हाध्यक्षांचं मोबाईलमध्ये तोंड, पुढं काय झालं?

-सोनिया गांधींचे निकटवर्तीय आणि राज ठाकरे यांच्यात 20 मिनिटे चर्चा!

पोटनिवडणूक : जिंदमध्ये भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने; काँग्रेस तिसऱ्या स्थानावर

राजस्थानच्या रामगडमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला चारली पराभवाची धूळ

मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत भ्रष्टाचार करत रहायचा का?,अण्णांचा सरकारला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या