बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पक्ष ज्यावेळेस एक नंबरचा होईल, मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार”

बीड | 2019 विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून वादंग झाला होता. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना, भाजपची युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यातच आता महाविकास आघाडीतील नेते पुढचा मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा असेल, असा दावा करत आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाचं असेल, असं म्हटलं आहे.

लहान अपेक्षा आम्ही कार्यकर्त्यांसमोर व्यक्त करत नाही. पक्ष वाढीची ज्या ज्या वेळेस चर्चा होते त्यावेळी कार्यकर्त्यांसमोर पक्ष एक नंबरचा झाल्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल, असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं आहे. तसेच सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

राज्यामध्ये उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. ज्यावेळी पक्षवाढीच्या संदर्भात चर्चा होते. तेव्हा आम्हाला आमचा पक्ष पहिल्या क्रमांकाचा कसा होईल, यासाठी विचार करावा लागतो. राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला तर मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाचं होईल, असा पुनरूच्चार धनंजय मुंडेंनी केला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी टोला लगावला आहे. स्वप्न बघणे हा सर्वांचा अधिकार असून काही लोक दिवसा स्पप्न बघतात. लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री कोण बनेल हे जनता ठरवत असते, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

Rajyasabha Election| महाविकास आघाडीला दुसरा मोठा झटका

मोठी बातमी! करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या 55 जणांना कोरोनाची लागण

“महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना देखील आवडला असता”

“आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, शेंबड्या पोराला समजवतात तसं पडळकरांना समजवा”

Monsoon Update: पुढील पाच दिवसात राज्यातील ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More