देश

“देश कोरोनाशी लढतोय, काँग्रेस मात्र मोदी सरकारवर टीका करण्यात मग्न”

नवी दिल्ली | आपला देश कोरोना नावाच्या संकटाशी लढतोय. मात्र काँग्रेस या पक्षाला मात्र मोदी सरकारवर टीका करण्याशिवाय काहीही दिसत नाही, असं म्हणत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकार असंवेदनशील आहे असं म्हटलं होतं. सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए अर्थात महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी केंद्र सरकारने मेट्रोचा प्रकल्प का स्थगित केला नाही, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे.

सोनिया गांधी यांनीही मोदींवर निशाणा साधला होता. आता या सगळ्या टीकेला प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिलं आहे.

सध्याच्या घडीला सगळा देश कोरोना नावाच्या संकटाचा सामना करतो आहे. मात्र काँग्रेसला मोदी सरकारवर टीका करण्यातच धन्यता मानतं आहे. सध्या ज्या प्रकारे काँग्रेस नेते वागत आहेत त्याचं उत्तर त्यांना कधीतरी द्यावं लागेल, असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

‘भारतीय मनाने कणखर असून त्यांचं मनोबलच कोरोनावर मात करेल’; चीनमधील तज्ञांकडून कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या