Loading...

बटन दाबलं घड्याळाचं पण मत गेलं कमळाला; नवलेवाडीतील नवल

सातारा | विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यात मतदान झालं. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडलं. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घड्याळाला मतदान केलं असलं तरी मत कमळाला जात असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. साताऱ्यातील नवलेवाडीतील हा प्रकार आहे.

ईव्हीएममध्ये झालेला बिघाड लक्षात आला तरीही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. काही वेळानंतर मशीन बदललं तरीही मशीनमध्ये बिघाड कायम होता. विशेष म्हणजे घड्याळाला मतदान केल्यानंतर मत कमळाला जात असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून यासंबंधी काय कार्यवाही केली जाते हे पाहावं लागेल.

Loading...

 

Loading...