Loading...

घड्याळाचं बटन दाबलं, मात्र मत गेलं कमळाला; मतदारांचा गंभीर आरोप

सातारा | विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यात मतदान झालं. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडलं. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घड्याळाला मतदान केलं असलं तरी मत कमळाला जात असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

साताऱ्यातील नवले गावातील हा प्रकार आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारा मतदान केलं, मात्र व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपच्या उमेदवाराला मत गेल्याचं दिसलं, असं मतदारांनी म्हटलं आहे.

Loading...

गावकऱ्यांनी यासंबंधीची तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे केली. अगोदर अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, गावकरी आक्रमक झाल्याने ईव्हीएम मशीन बदलण्यात आली व पुढील मतदान प्रक्रिया पार पडली.

विशेष म्हणजे घड्याळाला मतदान केल्यानंतर मत कमळाला जात असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून यासंबंधी काय कार्यवाही केली जाते हे पाहावं लागेल.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

 

Loading...