बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपण झोपतो तेव्हा कोरोना विषाणूही झोपतो”

लाहोर | पाकिस्तानच्या एका धर्मगुरुने दिलेला सल्ला सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या धर्मगुरुने आपल्या अनुयायांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जास्तीत जास्त झोपण्याचा सल्ला दिला आहे.

हा व्हीडिओ नक्की कुठे आणि कोणी शूट केला यासंदर्भात माहिती मिळालेली नाही. व्हीडिओमधील सल्ला अगदी स्पष्टपणे ऐकू येत असल्याने अनेकांनी यावरुन आता या धर्मगुरुंच्या सल्ल्याची चिकित्सा करण्यास सुरुवात केली आहे.

आपले डॉक्टर कायमच जास्त काळ झोपण्याचा सल्ला देतात. आपण जेवढा जास्त वेळ झोपू तितक्या वेळ विषाणूही झोपलेला असतो. अशावेळी तो आपल्याला त्रास देत नाही. आपण झोपतो तेव्हा तो ही झोपतो. आपण मरतो तेव्हा तो ही मरतो, असं या व्हीडिओमध्ये हा धर्मगुरु सांगताना दिसत आहे.

दरम्यान, या धर्मगुरूंचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हीडिओवर आपल्या मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

 

ट्रेंडिंग बातम्या-

देशात कोरोनाचा कहर सुरूच… पाहा कालच्या दिवसांतली धक्कादायक आकडेवारी

सुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…

महत्वाच्या बातम्या-

गौतम गंभीर म्हणाला, धोनीने मोठी चूक केली, त्याने ही चूक केली नसती तर…

शाळा सुरु करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

भारताला ‘या’ बाबतीत जगातल्या सर्वोच्च तीन देशांच्या क्रमवारीत आणायचंय- राजनाथ सिंग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More