Chhagan Bhujbal l महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखद स्प्ष्टपणे बोलून दाखवली. मात्र त्यानंतर छगन भुजबळ हे भाजप पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच यासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वाची माहिती समोर :
महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. कारण छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क वर्तवले जात होते.
मात्र, आता छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. मात्र या भेटीत ओबीसींच्या मुद्यावर त्यांची चर्चा झाली असल्याचे भुजबळांनी सांगितले होते. मात्र त्यावेळी भुजबळांची थेट भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.
Chhagan Bhujbal l भुजबळ भाजपमध्ये प्रवेश कधी करणार? :
मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना तूर्तास भाजपमध्ये घेतलं जाणार नाही. कारण छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत. तसेच महायुतीत वाद नको म्हणून छगन भुजबळ यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांना सोबत घेऊन भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसला दुखावू इच्छित नाही. तसेच महायुतीत छगन भुजबळ यांचा सन्मान राखला जावा असं भाजपच्या दिग्गज नेत्याचं मत आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या महायुतीतील नाराज असलेल्या नेत्यांसंदर्भात महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
News Title : When will Chhagan Bhujbal join BJP?
महत्त्वाच्या बातम्या-
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खुलासा होणार?, SIT मध्ये ‘या’ मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश
बीड पोलीस ठाण्यात आणले 5 पलंग, रोहित पवारांनी कराड कनेक्शन असल्याचा केला आरोप!
‘हळूहळू टीव्ही, एसी असं सगळंच…’; वाल्मिक कराडला तुरुंगात मिळतेय VIP ट्रीटमेंट?
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी कराडचं एन्काऊंटर होणार?, अत्यंत खळबळजनक दावा समोर
“हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक होते पण महाराष्ट्रात…”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल