बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?; विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | मागील वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती खूपच गंभीर होती. परंतू, आता कोरोनाची परिस्थिती हळू-हळू सुधारत आहे. रूग्णांच्या संख्येतही घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने अनलॉक करायला सुरूवात केलीये.

कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार? हा प्रश्न केला जात आहे. याबाबत मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. करोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सुरु होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आज मुंबईमध्ये विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच मुंबईमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होत चालली आहे. असं असलं तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी टप्पा तीनचेच निर्बंध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान,मुंबईतील पॉझिटिव्ही रेट कमी झाल्यानं काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. मात्र, मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून प्रवास करण्यास सर्वसामान्यांना अद्याप परवानगी देण्यात आली नसल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

पुन्हा युती होऊ शकते, प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातलं बोलले- गिरीश बापट

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- विजय वडेट्टीवार

“मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही”

“आम्ही वाघाच्या काळजाचे, शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठिशी ठाम उभी”

“एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, पण शिवसेनेला हात लावायचं नाही हे ठरलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More