Top News महाराष्ट्र मुंबई

शाळा कधी सुरू होणार?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

मुंबई | शाळा कधी सुरू होणार? शाळा कशा भरणार?असे अनेक प्रश्न मुलांना आणि त्यांच्या पालकांना पडले असताना त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना संकटकाळात पालक आणि मुख्याध्यापकांची मुलांबाबत असलेली काळजी लक्षात घेऊन राज्यातील शाळा 1 जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.

या निर्णयामुळे राज्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहेत. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यात शाळा, कॉलेजदेखील पुढच्या महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा कधी सुरू होतील, या प्रश्नाबाबत पालक आणि मुख्याध्यापकांची सातत्याने चर्चा सुरू आहे. याबाबत राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्ट्यादेखील कमी करून शैक्षणिक दिवस भरून काढण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती पवार यांनी दिली आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, शाळा 15 जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

जिल्ह्याची हद्द ओलांडणं संभाजी भिडेंना महागात; पोलिसांत गुन्हा दाखल

राज्यात आज 8381 रूग्ण ठणठणीत होऊन घरी… बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येचा आज उच्चांक!

महत्वाच्या बातम्या-

प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी…!

खाजगी डॉक्टरांसाठी ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

“जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या